सर्वात वर

शेअर बाजारात पडझड सुरूच : SENSEX ३३७ अंकांनी घसरला

विश्वनाथ बोदडे नाशिक

भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) सध्या दोन दिवस वर तर दोन दिवस खाली अशाप्रकारे चढ-उताराचे वातावरण दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आर्थिक जगतामध्ये संमिश्र व अस्थिर स्वरुपाचे वातावरण दिसत आहे त्याचाच परिणाम संपूर्ण जागतिक बाजारावर आपल्याला बघायला मिळत आहे.

अमेरिका हे संपूर्ण जगाचे केंद्रस्थान आहे कारण अमेरिकेमध्ये होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे परिणाम संपूर्ण जगात उमटत असतात त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे संपूर्ण जगामध्ये USD INR म्हणजेच डॉलरचा वापर केला जातो.

आजच्या भारतीय शेअर बाजाराचा (Todays Stock Market) विचार केला तर जागतिक स्तरावरील संमिश्र व अस्थिर संकेत त्याचबरोबर सिंगापुर निफ्टी फ्लॅट स्वरूपात होते, त्यामुळे भारतीय शेअर बाजार सुद्धा फ्लॅट स्थिर स्वरूपात ओपन झाला. आज भारतीय शेअर बाजारात फ्युचर आणि ऑप्शन ची विकली एक्सपायरी होती त्यामुळे बाजारात सोमवार आणि मंगळवारी झालेली तेजी काल आणि आज नफा वसुली मध्ये रूपांतरित झालेली दिसली, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 337 अंकांनी घसरून 49 564 या पातळीवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 124 अंकांनी घसरून 14 906 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला 350 अंकांनी घसरून 33334 ह्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकेतील थेट मीटिंग चे पॉईंट्स आणि बोंड यील्ड याचा परिणाम जगातील सर्वच शेअर बाजारांमध्ये दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये ज्या व्हर्च्युअल करन्सी यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आली होती त्या करन्सी मध्ये 40 ते 50 टक्के इतकी घसरण बघायला मिळाली त्याचाही परिणाम जागतिक दिसत आहे कारण ह्या करन्सी म्हणजेच क्रिप्टो,बिटकॉइन, आणि इतर करन्सी या भारतीय बाजारामध्ये लिस्ट नाहीत, तरीसुद्धा याचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर पडतांना दिसत आहे.

आता जरी बाजारामध्ये अस्थिरता अथवा चढ उतार दिसत असले तरी एकदा करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आणि काही राज्यात सुरु असलेला लॉक डाऊन संपला व सर्व सुरळीत व्यवहार सुरू झाले तेव्हा मात्र बाजारामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळेल म्हणून आम्ही गुंतवणूकदारांना नेहमी सल्ला देत असतो की आपली गुंतवणूक ही बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबून टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करत राहावे.

(Todays Stock Market)

NIFTY १४९०६ – १२४

SENSEX ४९५६४ – ३३७

BANK NIFTY ३३३३४ – ३५० 

(Todays Stock Market) आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

CIPLA ९२६ + २%

M&M ८०३ + २%

BPCL ४५६ + २%

INDUSINDBK ९७७ + १%

TITAN १५३६ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA STEEL ११०५ – ५%

HINDALCO ३८६ – ४%

COAL INDIA १४७ – ३%

BRITANNIA ३४२९ – ३%

ONGC ११२ – ३%

यु एस डी आय एन आर $ ७३.१७००

सोने १० ग्रॅम         ४८४५०.००

चांदी १ किलो        ७२०७०.००

क्रूड ऑईल             ४६०६.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे नाशिक

Mobile – 8888280555