सर्वात वर

शेअर बाजारात घसरण

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

देशभरात वाढत असलेले कोविड चे रुग्ण, अमेरीकन बॉण्ड ईल्ड, वाढत्या  महागाई चे आकडे  शेअर बाजारात नवीन येत असलेले IPO ह्या सर्वांच्या बरोबरच जागतिक स्तरावरील संकेत ह्या सर्वांनमुळे भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सध्या मोठ्या प्रमाणात VOLATILE  बघायला मिळत आहे. दिवसभरात चढ उतार जरी दिसले असले तरी दुपारच्या सत्रात खालच्या स्तरावरून बाजारात चागली खरेदी बघायला मिळाली यामुळे मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 87 अंकांनी घसरून 49771 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 8 अंकांनी नकारात्मक बंद झाला मात्र  बारा BANKING SHERES चा निर्देशांक NIFTY BANK 558 अंकांक घसरण झाली .

बाजारातील जाणकार सांगत आहेत की, सध्या बाजार VOLATILE असला तरी काही क्षेत्रात खरेदी करून नफा कमावण्याची संधी मिळत आहे, आज खऱ्या अर्थाने IT क्षेत्राने सावरले आहे.

आपणास माहीत आहे की ,गेल्या वर्षी कोविडमुळे २३ मार्च २०२० ला जागतिक स्तरावरील कोविड-१९ मुळे लॉकडाउन चा परीणाम भारतीय शेअर बाजारात(Todays Stock Market) दिसला होता त्यामुळे शेअर बाजारात लोवर सर्किट लागले होते , त्यामुळे पंचाळीस मिनिट बाजार बंद करण्यात आला होता यादिवशी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३९३५ अंकांनी म्हणजे १३% एवढे घसरून २९९१५ ह्या पातळीवर स्थिरावला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ११३५ अंकांनी घसरून ८७४५ ह्या पातळीवर बंद झाला होता. बाजारात भीती होती की,  पुढे काय होईल त्यामुळे काही क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विक्री दिसली होती त्यात आघाडीवर ऑटो क्षेत्र होते.

परंतु लॉकडाउन मध्ये जरी जनतेला घरच्या बाहेर निघता येत नव्हते परंतु ह्याच दरम्यान लोकांना उत्पन्नाचा नवीन मार्ग म्हणून शेअर बाजार ठराला त्यामुळे बाजारात मोठ्या संख्येने डीमॅट खाते सुद्धा उघडले गेले होते त्यामुळे सेन्सेक्स  ने  ऐतिहासीक नवा उंचांक गाठला  २१ जानेवारीला ५०००० चा स्तर गाठला  तर १५  फेब्रुवारी २०२१ ला ५२०००  तर निफ्टीने १५२८९ हा नवीन स्तर बनवला होता. 
आज २२ मार्च २०२१ ला (Todays Stock Market) सेन्सेक्स  ४९७७१ आणि निफ्टी १४७३६ ह्या पातळीवर स्थिरावला

(Todays Stock Market)

NIFTY १४७३६ – ८

SENSEX ४९७७१ – ८७

BANK NIFTY ३३६०३ – ५५८


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
ADANIPORTS ७२२ + ५%
TECHM १०१५ + ३%
BRITANNIA ३५५५ + ३%
TCS ३१२८ + ३%
SUNPHARMA ५९१ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

INDUSINDBK ९६९ – ४% 
POWERGRID २२२ – ३%
ICICI BANK ५७४ – २%
TATA MOTOR ३०३ – २%
HDFC BANK १४७४ – २%

यु एस डी आय एन आर $ ७२.४१५०

सोने १० ग्रॅम        ४४७३८.००

चांदी १ किलो       ६६२००.००

क्रूड ऑईल            ४४५५.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक

संपर्क- 8888280555