सर्वात वर

शेअर बाजार नकारात्मक बंद : सेन्सेक्स २९० अंकांनी गडगडला

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

भारतीय शेअर बाजारातील (Todays Stock Market )आजचे सत्र अस्थिर म्हणजेच चढ-उताराचे परंतु नफा वसुलीचे होते, असे म्हणावे लागेल कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही प्रमाणात नकारात्मक संकेत असल्यामुळे सकाळी सिंगापुर निफ्टी साधारणपणे ९० अंकांनी निगेटिव्ह होते. त्याचाच परिणाम सकाळी भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market ) बघायला मिळाला फ्लॅट टू निगेटिव्ह अशा स्वरूपात बाजार उघडला परंतु त्यानंतर बाजारात हलक्या स्वरूपात मागणी दिसली, पण ही सकारात्मकता काही काळ टिकली व त्यानंतर मागील दोन दिवसांपासून चे समभाग वधारले होते त्यामध्ये नफा वसुली बघायला मिळाली.

त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 290 अंकांनी घसरून 49 902 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक सुद्धा 78 अंकांनी घसरून 15030 या पातळीवर बंद झाला आणि 12 बँकिंग शेअर चा निर्देशांक बँक निफ्टी 237 अंकांनी घसरून ते 33685 या पातळीवर बंद झाला.

आज सकाळपासूनच बाजारामध्ये वरच्या स्तरावर ठराविक क्षेत्रांच्या समभागांमध्ये विक्री दिसत होती, कारण मागील दोन दिवसांपासून बाजारामध्ये जी तेजी आली होती त्याच क्षेत्रांमध्ये नफा वसुली बघायला मिळाली, म्हणजेच बाजारात खालच्या स्तरावर खरेदी केली जात आहे ,तर वरच्या स्तरावर नफा नफा सुद्धा बुक केला जात आहे.

अमेरिकेमध्ये ची मिटिंग आज होणार आहे या निकालावर सुद्धा तेथील बाजारात त्याचे पडसाद रात्री दिसतीलच त्याच बरोबर भारतामध्ये करोनाची रुग्ण संख्या काय असणार आहे यावर बाजाराचे भविष्य अवलंबून असले तरी येऊ घातलेले तिमाही निकाल सुद्धा तेवढेच महत्त्वाचे दिशादर्शक ठरणार आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक न थांबता आपल्या चांगल्या सल्लागारांच्या मार्फत आपला पोर्टफोलिओ तयार करून गुंतवणूक सातत्याने टप्प्याटप्प्याने करत राहणे योग्य राहील.

गुंतवणूकदारांनी सध्यातरी चांगल्या प्रतीचा फ्रन्टलाइन त्याच बरोबर मिडकॅप समभागांमध्ये आपली गुंतवणूक बाय ऑन डीप या तंत्राचा वापर करून बोलतोय करावी.

NIFTY १५०३० – ७८

SENSEX ४९९०२ – २९०

BANK NIFTY ३३६८५ – २३७ 

(Todays Stock Market ) आज निफ्टी वधारलेला शेअर्स

COAL INDIA १५२ + ४%

CIPLA ९०३ + २%

SUNPHARMA ७०४ + २%

UPL ७८२ + २%

NESTLEIND १७४३२ + २%

(Todays Stock Market )आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA MOTORS ३१४ – ५%

BAJAFINSV १११९५ – २%

M&M ७८४ – २%

HDFC २४६१ – २%

JSW STEEL ७०६ – २%

यु एस डी आय एन आर $ ७३.२५००

सोने १० ग्रॅम        ४८१७०.००

चांदी १ किलो      ७१९८०.००

क्रूड ऑईल          ४६८०.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक 


संपर्क – 8888280555