सर्वात वर

SENSEX 568 अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

(Todays Stock Market)हा आठवडा भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात चढ उताराचा (VOLATILE)  बघायला मिळाला,  कालच्या मोठया पडझळी नंतर आज मात्र बाजाराला जागतिक स्तरावरील संकेतांनी सावरले, कारण काल रात्री अमेरीकन बाजारात तेजी दिसली त्याची छाप सिंगापूर निफ्टी मध्ये बघायला मिळाली, सकाळी सिंगापूर निफ्टी 170 पेक्ष्या जास्त अंकांनी सकारात्मक होते त्याचाच परीणाम भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा दिसला. सकाळी तेजीत उघडलेला बाजार (Todays Stock Market ) काही काळ खाली वर झाला त्याला कारण म्हणजे देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात वाढत्या करोनाची रुग्ण संख्या 

.ह्या सर्वांचा परिणाम बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 568 अंकांनी वधारून 49008 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 182 अंकांनी वधारून 14507 वर स्थिरावला, त्याच बरोबर बारा बँकिंग मिळून तयार झालेला NIFTY BANK 311 अंकांनी वधारून 33318 ह्या पातळीवर बंद झाला. 
आजच्या सत्राला वर ठेवण्यात मेटल, एफ एम सी जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वाटा दिसला . आजच्या बाजाराच्या  (Todays Stock Market ) लांबीचा विचार केला तर 1633 समभाग सकारात्मक होते तर 1283 समभाग नकारात्मक होते आणि 167 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही. 

बाजारातील जाणकारांनी उल्लेख केला होता की, बाजारात मोठया प्रमाणात IPO येत आहेत त्यामुळे बाजारातून पैसे बाहेर निघत आहे त्याच बरोबर FII वरच्या स्तरावर विक्री करतांना दिसत आहे आणि वाढती करोनाची संख्या बाजारासाठी  काही काळ तरी चिंतेची बाब आहे , त्यामुळे नवीन IPO हे ISSUE किमती पेक्ष्या कमी भावात उघडत आहेत . गुंतवणूकदारांनी प्रत्येक खालच्या स्तरावर गुंतवणूक करावी असे बाजारातील जाणकार सांगत आहेत.सोमवारी आणि पुढील शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे .

(Todays Stock Market )

NIFTY १४५०७ + १८२
SENSEX ४९००८ + ५६८
BANK NIFTY ३३३१८ + ३११


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

TATA STEEL ७६५ + ६%
BAJAFINSV ९४६० + ४%
ASIANPAINT २४९८ + ४%
HINDALCO ३२६ + ४%
TATA MOTOR २९७ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

UPL ५८७ – २%
POWERGRID २१४ – १%
EICHERMOT २५६२ – १%
ITC २११ – ०.३३%
INDUSINDBK ९५५ – ०.२३%

यु एस डी आय एन आर $ ७२.९७००

सोने १० ग्रॅम         ४४५६०.००

चांदी १ किलो        ६५०९०.००

क्रूड ऑईल             ४३७५.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक

संपर्क – 8888280555