सर्वात वर

SENSEX ६४१ अंकांनी वधारला

 विश्वनाथ बोदडे, नाशिक

(Todays Stock Market)
आजचे सत्र मोठ्या प्रमाणात VOLATILE( चढ उतार)  बघायला मिळाले , सकाळी जगातील स्तरावरील संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सुद्धा नकारात्मक उघडले होते ,परंतु कल FO  EXPIRY आणि US BOND YEILD मुळे बाजारात SELLING बघायला मिळाले होते त्याचची भीती आज बाजारात होती त्यामुळे बाजारात नकारात्मक उघडून अजून खाली गेले परंतु दुपारनंतर बाजारात खरेदी बघायला मिळाली त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक खालच्या स्तरावरून तब्बल 641 अंकांनी वधारून 49858 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नासा समभागांचा निर्देशांक NIFTY 186 अंकांनी वधारून 14744 ह्या पातळीवर बंद झाला तर बारा बँकांचा निर्देशांक NIFTY BANK 304 अंकांनी वधारून 304  अंकांनी वधारून  34161 ह्या पातळीवर बंद झाला.

आज बाजार खूप मोठया प्रमाणात VOLATILE दिसला त्याचे चित्र बघितले तर INTRADAY मध्ये SENSEX 1417 , NIFTY 438 अंकांनी आणि NIFTY BANK 994 अंकांनी खाली वर बघायला दिसले. आजच्या बाजाराचा दोन शब्दात उल्लेख करायचा झाला तर कभी खुशी कभी गम असे होते . ज्यांनी खालच्या स्तरावर विक्री केली त्याचे नुकसान  झाले तर ज्यांनी खालच्या स्तरावर खरेदी केली त्यांना नफा झाला . 
बाजाराचे जाणकार सांगत आहेत की, बाजार।थोडा ही खाली आला की गुंतवणूकदरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे त्याला कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती भारतात वाढत असलेले कोविड चे रुग्ण ,  परंतु गुंतवणूकदारांनी चांगल्या प्रतीच्या स्टॉक मध्ये बाय ऑन डीप मध्ये खरेदी केली तर नफा मिळत आहे. 

(Todays Stock Market)
NIFTY १४७४४ + १८६ 

SENSEX ४९८५८ + ६४१

BANK NIFTY ३४१६१ +  ३०४

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स
HINDUNILVR २३१५ + ५%
NTPC १०८ + ४%
JSW STEEL ४४० + ४%
UPL ६२५ + ४%
TATA STEEL ७३२ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TECHM ९८४ – १%
LT १४१४ – १%
BAJAJ AUTO ३६४६ – १%
COALINDIA १३६ – १%
TITAN १४६३ – ०.३५%

यु एस डी आय  एन आर $ ७२.५९२५

सोने १० ग्रॅम           ४४९७०.००

चांदी १ किलो         ६७४५०.००

क्रूड ऑईल              ४३५५.००

Vishwanatha-Bodade
 विश्वनाथ बोदडे, नाशिक


संपर्क-8888280555