सर्वात वर

शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ५१४ अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

आंतरराष्ट्रीय  स्तरावरील संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन झाला परंतु काही काळ ही नकारात्मकता टिकली  सुद्धा परंतु बाजारातील दिग्गज क्षेत्रांच्या भागांमध्ये खरेदी बघायला सुरुवात झाली त्यामध्ये आघाडीवर होते मेटल बँकिंग ऑइल आणि गॅस, त्याच बरोबर शुक्रवारची रिलायन्स च्या शेअर मध्येही आज तेजी बघायला मिळाली. त्यातच दुपारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारसुद्धा सकारात्मक झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market) समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 514 अंकांनी वधारून 51 937 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निघती सुद्धा 147 अंकांनी वधारून 15 582 ह्या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग समभाग मिळून तयार झालेला बँक निफ्टी निर्देशांक 385 अंकांनी वधारून 35 526 या पातळीवर बंद झाला.

उद्या म्हणजे १ जून ला जीडीपी चे अधिकृत आकडे येणार आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी मध्ये बराच काही लाभदायी तरतुदी करण्यात आलेल्या आहे परंतु दुसरी बाजू म्हणजे आणि केंद्र सरकारला विचार करायला भाग पाडणारे कारण म्हणजे वाढत्या इंधनाच्या किमती यामुळे महागाई वाढताना आपल्याला दिसत आहे.कोणत्याही देशाचा शेअर बाजार जरी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रेझेंट करत नसला तरी संपूर्ण जगामध्ये त्या देशाच्या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे समभाग व निर्देशांक किती कमी अथवा जास्त होत आहे यावर जगातील सर्व मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष असते.

भारतीय शेअर बाजारांमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे हे एका प्रकारे शेअर बाजारासाठी समाधान कारक मनावे लागेल कारण यामुळे बाजारामध्ये देशी आणि विदेशी संस्था यांच्यामार्फत होणारी गुंतवणूक त्याच बरोबर रिटेल गुंतवणूक दारांना कडून होत असलेली गुंतवणूक ही सातत्यपूर्ण होत राहिली तर बाजारामध्ये अजून मोठ्या प्रमाणात तरलता येऊ शकेल.

(Todays Stock Market)

NIFTY १५५८२ + १४७

SENSEX ५१९३७ + ५१४

BANK NIFTY ३५५२६ + ३८५ 

(Todays Stock Market)आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

JSW STEEL ७१२ + ३%

ICICI BANK ६६२ + ३%

RELIANCE २१५३ + ३%

BHARTIARTL ५३६ + २%

TATA STEEL ११२७ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

M&M ८०९ – ४%

ADANIPORTS ७६९ – १%

HDFC LIFE ६६५ – १%

IOC १०९ – १%

INDUSINDBK १०१५ – १%

यु एस डी आय  एन आर $ ७२.९१५०

सोने १० ग्रॅम         ४८७३५.००

चांदी १ किलो       ७१९००.००

क्रूड ऑईल            ४८८५.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

संपर्क – 8888280555