सर्वात वर

सेन्सेक्स १११ अंकांनी वधारला : बँकाच्या शेअर मध्ये वाढ

विश्वनाथ बोदडे,नाशिक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाकारात्मक संकेत असतानासुद्धा भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकारात्मक ओपन झाला. त्याला मुख्य कारण म्हणजे जसे आम्ही मागील लेखांमध्ये उल्लेख केलेला होता की, काही राज्यांमध्ये सुरु असलेला लोक डाउन काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे ,त्याच बरोबर ज्या कंपन्या बंद आहेत त्यांना अटी आणि शर्ती च्या आधारे सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे आणि दुसरीकडे कारोनाची  रुग्ण संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत आहे त्याचबरोबर  जून आणि जुलै महिन्यापासून  लसीकरण मोहीम सुद्धा स्पीड पकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

या  सगळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर आज भारतीय शेअर बाजार( Todays Stock Market ) VOLATILE तर राहिलाच परंतु बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 111 अंकांनी वधारून 50652 या पातळीवर स्थिरावला सर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास सर्व भागांचा निर्देशांक NIFTY  22 अंकांनी वधारून 15198 ह्या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला हा निर्देशांक 336 अंकांनी वरून 34943 या पातळीवर बंद झाला.

आज बाजारामध्ये बघितले तर संमिश्र वातावरण बघायला मिळाले कारण एकीकडे बँकिंग कॅपिटल गुड्स ह्या क्षेत्रांच्या समभागांमध्ये खरेदी बघायला मिळाली तर मेटल, एफ एम सी जी, ग्राहक उपयोगी असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री बघायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचार केला तर युके आणि यु एस मधील मॅन्युफॅक्चरिंग डेटा हा रेकॉर्ड हाय वर दिसला त्यामुळे तिथे पुढील इन्फ्लेशन काय असेल यावर सुद्धा तेथील बाजाराची स्थिती अवलंबून राहणार आहे आणि त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारांमध्ये निश्चितच आपल्याला दिसतील.

धातु बाजाराचा विचार केला तर गोल्ड आणि सिल्वर यांच्या किमती वधारत आहेत त्याच बरोबर निकेल  आणि मेटल क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असतो ते म्हणजे कॉपर या जातीच्या किमतीसुद्धा वधारत आहेत.

NIFTY १५१९८ + २२

SENSEX ५०६५२ + १११

BANK NIFTY ३४९४३ + ३३६ 

Todays Stock Market  – आज निफ्टी वधारलेला शेअर्स 
IOC १०९.४० + ५%

BPCL ४७४ + ३%

SBIN ४११ + ३%

LT १४४३ + २%

EICHERMOT २५५९ + २%

Todays Stock Market  – आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SHREECEM २६९३० – ३%

JSW STEEL ६८२ – २%

TATA STEEL १०९२ – २%

BRITANNIA ३३८५ – २%

INDUSINBK १००२ – १%

यु एस डी आय  एन आर $ ७२.९६२५

सोने १० ग्रॅम          ४८४८३.००

चांदी १ किलो        ७१५५०.००

क्रूड ऑईल            ४६२३.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

संपर्क – 8888280555