सर्वात वर

शेअर बाजार ६००अंकांनी वधारला

विश्वनाथ बोदाडे ,नाशिक 

जागतिक स्तरावरील संकेत जरी संमिश्र स्वरूपाचे असले तरी सकाळी सिंगापुर निफ्टी सकारात्मक दिसल्याने भारतीय शेअर बाजाराची (Todays Stock Market) सुरुवात सुद्धा  सकारात्मक होण्यास मदत झाली. परंतु जरी सुरुवात सकारात्मक झाली असली तरी बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला दिसले.

काल बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम आज बाजारात जरी दिसला नसला तरी आयटी क्षेत्राने बाजाराला निराश केले आणि इन्फोसिस, विप्रो टीसीएस ,टेक महिंद्रा, माइंड ट्री या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली याचे मुख्य कारण म्हणजे ती माही  निकाल आणि इन्फोसिस या कंपनीने होऊ घातलेले बाय बॅक.

आजचा बाजार मोठ्या प्रमाणात चढ-उताराचा दिसला असला तरी बाजारामध्ये पी एस यु,बँकिंग मेटल, सामान्य जनतेच्या नेहमीचा  वापरात येणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगल्या प्रमाणे मागणी बघायला मिळाली त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market) 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ६६० अंकांनी वधारून ४८५४४ या स्तरावर स्थिरावला , त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० समभागांचा निर्देशांक तब्बल १९४ वधारून १४५०५ या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर १२ बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी तब्बल ९७९ या अंकांनी ३१७७१ या पातळीवर बंद झाला.


आजच्या बाजाराचे (Todays Stock Market) विश्लेषण व शेअर बाजाराचे जाणकार असे करत आहे की जसे आम्ही मागील काही लेखांमध्ये जनस्थान च्या माध्यमातून बाजारातील जाणकारांनी आपल्याला बऱ्याच वेळा मार्गदर्शन केले आहे की बाजारात आता आणि यापुढे सुद्धा चढ-उतार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतील त्याचे कारण म्हणजे जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती त्याच बरोबर स्थानिक स्तरावर भारतामध्ये वाढते असलेले करोनाचे रुग्ण अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी विचलित न होता मागील वर्षाचा लोकडाऊन चा अनुभव लक्षात ठेवून बाजारामध्ये आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये वेळेनुसार बदल करून आपल्या सल्लागाराच्या मार्फत गुंतवणूक करणे योग्य ठरेल त्याच बरोबर बाजारामध्ये स्थानिक वित्तीय संस्था आणि परदेशी गुंतवणूक संथाच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक करत आहेत यावर सुद्धा गुंतवणूकदारांनी आपले लक्ष ठेवायला हवे आणि आपली गुंतवणूक प्रत्येक वेळी बाय ओन डीप ह्या संकल्पनेचा आपण वापर करावा आणि आपल्या ऐपतीप्रमाणे बाजारामध्ये गुंतवणूक कायम ठेवावी.


भारतातील सर्वसामान्य आणि मोठे गुंतवणूकदार त्याच बरोबर एल आय सी आणि म्युचल फंड यांच्यामार्फत जी गुंतवणूक केली जाते ती लांब अवधीसाठी केली जाते त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना आपली गुंतवणूक लांब वधीसाठी आणि चांगल्या प्रतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक ठेवायला हवी व कोणत्याही बाहेरील किंवा ऐकीव  माहितीच्या आधारे गुंतवणूक करू नये आणि केली असल्यास त्याचा आढावा त्या कंपनीचा वार्षिक अहवाल कसा आहे याचा निष्कर्ष वेबसाईट वर बघावा आणि आपली गुंतवणूक योग्य आहे का हे पडताळून पाहावे आणि गुंतवणूक योग्य असेल तर लांब अवधीसाठी ठेवावी अन्यथा एक्यू पायरीच्या आधारे कोणतीही गुंतवणूक करु नये असे बाजारातील तज्ञ आपल्याला नेहमी सांगत असतात.
(Todays Stock Market)   

NIFTY १४५०५ + १९४
SENSEX ४८५४४ + ६६०
BANK NIFTY ३१७७१ + ९७९ 

Todays Stock Market – आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
M&M ८१० + ८%
BAJAFINSV ९७६६ + ७%
TATA MOTORS ३०२ + ५%
BAJFINANCE ४७३० + ५%
MARUTI ६८२५ + ५%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

DR.REDDY ४७९९ – ४%
TCS ३१२० – ४%
TECHM १००५ – ३%
WIPRO ४२२ – ३%
HCLTECH ९८८ – २%

यु एस डी आय  एन आर $ ७५.२०५०

सोने १० ग्रॅम         ४६३४०.००

चांदी १ किलो        ६६८४०.००

क्रूड ऑईल            ४५३५.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदाडे ,नाशिक