सर्वात वर
AC Ad

आता मुंबईत फिरता येणार इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीने

बातमीच्या वर

इतर शहरांमध्ये देखील सुरु होणार बग्गीची सुविधा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया(Electric Victoria Buggy)बग्गीचे अनावरण

Hon-cm-sir-electric-car-opening-photos..
Hon-cm-sir-electric-car-opening-photos..

मुंबई : आता नागरीकांना पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया (Electric Victoria Buggy) बग्गीने फिरता येणार आहे.मुंबईत पर्यटकांना फिरण्यासाठी तयार केलेल्या  व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले

उबो राईड्ज या कंपनीकडून ही इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी चालविण्यात येणारआहे. एकूण ४० व्हिक्टोरिया बग्गी टप्प्या-टप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १२ दक्षिण मुंबईत सुरु करण्यात येणार आहे. या १२ बग्गींपैकी ६ बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या ६ बग्गी नरीमन पॉईंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी ४ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे २५० बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर ७० ते ८० किमी पर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटन स्थळांवरही लवकरच सेवा सुरु केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही टायअप केला जाणार आहे.

इतर शहरात देखील धावणार इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गी (Electric Victoria Buggy)

मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळांवर देखील अशी सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या बग्गीत असणार आहे. 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गी चालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.

बातमीच्या मध्ये
Ac square