सर्वात वर

आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या प्रयत्नाने नव्याने १०० ऑक्सिजन सिलेंडर नाशकात दाखल

ऑक्सिजनची साखळी जोडू या कोरोनाची एकएक कडी तोडू या : ब्रेक द चेनला ऑक्सिजन चेनचा हात

नाशिक – आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या या जीवनदान यज्ञाचा वेग आणखी वाढला असून नव्याने १०० ऑक्सिजन (Oxygen)सिलेंडर नाशकात दाखल झाले आहेत.आता रोज शंभर गरजवंत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.नव्या मोहीमेअंतर्गत शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या तरूण समन्वयकांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून संबधित भागातील गरजवंत रूग्णाला या तरूणांच्या मार्फत ऑक्सिजन(Oxygen) पुरवठा केला जाणार असल्याने प्रतिदीन शंभर जणांचा जीव वाचवता येणार आहे. आॕक्सीजनची साखळी जोडू या कोरोनाची एकएक कडी तोडू या ब्रेक द चेनला (Break the Chain) आॕक्सीजन चेनचा हात तुषार जगताप यांनी दिला आहे. 


कोरोनाचा महाराष्ट्र  म्युटंट सध्या राज्यात धुमाकुळ घालतो आहे.विशेषतः तरूणांवर या म्युटंटचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याने तरूण पिढी संक्रमणाला बळी पडत असल्याचे चिञ आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना तरूणांना मोठ्या प्रमाणावर बाधीत करण्याचे प्रमाण वाढण्याचे कारण स्पष्ट करतांना प.बंगालमधील मायक्रोबायोलाॕजीस्ट डाॕ.श्रीधर चिन्नास्वामी यांनी या वयोगटातील सारख्या क्षमतेची प्रतिकार शक्ती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.म्हणूनच आपल्या तरूण पिढीला वाचविण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यायला हवा ही जाणीव झाल्याने पंचवटीतील तरूणांनी श्रीमंत संभाजीराजे छञपती वैद्यकीय मदत केंद्राची स्थापना करून या केंद्राच्या माध्यमातून बाधीत गरजवंत रूग्णांना घरपोच आॕक्सीजन सिलेंडर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डाॕ.चिन्नास्वामी यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक भागाची जीवन शैली वेगळी असल्याने प्रतिकार शक्तीतही वैविध्य जाणवते.त्याचाच परिणाम म्हणून म्युटंट भारतियांवर तेव्हढ्या वेगाने मारा करण्यास असमर्थ ठरत आहे.याउलट एकसारख्या प्रतिकार क्षमतेचा मोठा वर्ग जिथे असेल तेथे हा म्युटंट वेगाने बाधा करण्यात यशस्वी ठरतो आहे,महाराष्ट्रातील तरूण याच कारणांमुळे जास्त संख्येने बाधीत होत असल्याचा दावा करीत आॕक्सीजनची पातळी खालावण्यापर्यंत वेळ आल्यास तात्काळ आॕक्सीजन पुरवठा झाल्यास मृत्यू दर रोखणे शक्य असल्याची खाञी डाॕ.चिन्नास्वामी व्यक्त करतात.हीच बाब छञपती वैद्यकीय मदत केंद्राचे मुख्य प्रवर्तक आरोग्यदूत तुषार जगताप यांनी लक्षात घेऊन गरजवंत रूग्णांसाठी घरपोच ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोडला आहे.गेल्या दोन तीन दिवसात दोनशेहून अधिक रूग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून या प्राणवायू यज्ञामुळे जीवदान मिळाले आहे.

आरोग्यदूत तुषार जगताप यांनी स्वतःच्या हिमतीवर ऑक्सिजन चेन निर्माण करून तरूण पिढीच्या मदतीने जीव वाचविण्याचा सोडलेला संकल्प म्हणूनच अधोरेखीत झाला आहे.छञपती खा.संभाजी राजे भोसले,आ.गिरीश महाजन यांच्यासारख्या अनेक समाज हितैषींनीही  या कामाचे कौतूक करून दखल घेतली आहे.

कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर  ब्रेक द चेन (Break the Chain) मोहीम कडक निर्बंधासह राबवली जात आहे.आरोग्यदूत तुषार जगताप यांनी तरूणांना सोबत घेऊन सुरू केलेली ही आॕक्सीजनची साखळी ब्रेक द चेनला बळ देणारी असून आॕक्सीजन साखळीत प्रत्येक तरूणाने कडी बनून सहभागी झाल्यास कोरोनाची कडी तोडण्यास वेळ लागणार नाही.एकूणच आरोग्यदूत तुषार जगताप आता आॕक्सीजन मॕन म्हणून समाजात ओळखले जात असून याआॕक्सीजन मॕनचा संकल्प धडाडीने पुढे नेण्यासाठी तरूण वर्गही सरसावला ही कोरोनाविरूध्दच्या लढाईला बळ देणारी सकारात्मक घटना मानली जात आहे.