सर्वात वर

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटींची तरतुद

नाशिक – (Union Budget 2021) अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर करतांना २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रासाठी या बजेट मध्ये मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोच्या फेज १ ची घोषणा केली आहे. या मेट्रो प्रकल्पा साठी २ हजार ९२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.त्यामुळे येत्या काही वर्षात नाशिककरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

अर्थसंकल्पात (Union Budget 2021) राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार करण्यात आली असून  रेल्वेसाठी तब्बल १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे व्यतिरिक्त मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.