सर्वात वर

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात:पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू

मुंबई – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक(Union Minister Shripad Naik) यांच्या गाडीला कर्नाटक मधील उत्तरा कन्नड येथे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले असून या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातामध्ये केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार अपघात झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या गाडीमध्ये सहा लोकं प्रवास करत होते. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.