सर्वात वर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्य त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात करण्यात आले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंचीचा पुतळा १२०० किलो ब्राँझ धातूपासून तयार  करण्यात आला आहे.दोन फूट उंच हिरवळीसह जवळपास  १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे.प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून सुप्रसिद्ध शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला आहे. 

या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस,ना.छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, ना.उदय सामंत, नीलम गोऱ्हे, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.