सर्वात वर

US Election Effects : शेअर बाजार ५०३ अंकांनी वधारला

बातमीच्या वर

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील सकारात्मक , आज अमेरीकेत होणाऱ्या निवडणुका , पाच नोव्हेंबर ला सुप्रीम कोर्टात Loan Moratorium बद्दल असलेली सुनावणी ह्या सर्वांचा परीणाम साध्य शेअर बाजारात उमटत आहे. आता सर्वांच्या नजरा ह्या अमेरिकेच्या आज होऊ घातलेल्या Election  कडे आहेत, परीणाम काय येतील हे काळ ठरवेल परंतु जागतिक शेअर बाजार सकारात्मक घेतांना दिसत आहेत. सकाळी सिंगापूर निफ्टी ६८ अंकांनी सकारात्मक उघडले त्याचाच परीणाम म्हणून  भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स ३०६  अंकांनी तर निफ्टी ९१ अंकांनी सकारात्मक उघडले आणि ही तेजी शेवट पर्यंत कायम बघायला मिळाली त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक तब्बल ५०३ अंकांनी वधारून ४०२६१ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास शेअर्सचा निर्देशांक निफ्टी सुद्धा १४४ अंकांनी वधारून ११८०० च्या वर म्हणजे ११८१३ ह्या पातळीवर स्थिरावला तर आज सुद्धा बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर कायम बघायला मिळाला त्यामुळेच बँक निफ्टी ७९०अंकांनी वधारून २५६८१ ह्या पातळीवर बंद झाला.आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर १३८१ समभाग सकारात्मक होते तर १२१५ समभाग नकारात्मक आणि १७९ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.

आजच्या बाजाराला खऱ्या अर्थाने सहकार्य केले त्यात ऑटो, बँकिंग हे आघाडीवर होते तर दुपारनंतर काही फार्मा कंपन्यांचे चांगले निकाल आल्यामुळे फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये सुद्धा चांगली मागणी दिसली . उद्याचे सर्व मार्केटचा ट्रेंड हा अमेरीकेतील हालचाली आणि निकालानंवर अवलंबून असणार आहे.

निफ्टी ११८१३ + १४४

सेन्सेक्स ४०२६१ + ५०३

बँक निफ्टी २५६८२ + ७९०

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स

आय सी आय सी आय बँक ४४५ + ७% 

हिंडालकाे १७९ + ५% 

एस बी आय २०४.५० + ४%

पावर ग्रीड १८० + ४%

एच डी एफ सी २१२१ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

यु पी एल ४१६ – ७%एन टी पी सी ८६ – ४%रीलायंस १८५४ – १.२५%नेस्टले इंडीया १६९२० – १%हिंदलीवर २०५० – १%

यु एस डी  आई एन आर $ ७४.५२०० 

सोने १० ग्रॅम         ५१०६०.००

चांदी १ किलो       ६२३२०.००

क्रूड ऑईल            २८३५.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक
8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली