सर्वात वर

नाशिक शहरात आज या लसीकरण केंद्रावर मिळणार लस


आज शहरात एकाच लसीकरण केंद्रावर मिळणार कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस 

नाशिक – नाशिक शहरात लस घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी गेल्या काही दिवसापासून लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून काही लसीकरण केंद्र बंद आहेत.जे लसीकरण केंद्र सुरु आहेत त्या केंद्रावर नागरीक पहाटे पासून नंबर लावून उभे असतात परंतु लसीच्या प्रचंड तुटवड्या मुळे अनेकांना लस मिळत नाही असे चित्र सर्वत्र बघायला मिळते आहे.

आज बुधवार  (१९ मे ) नाशिक शहरात एकाच लसीकरण (Vaccination Center) केंद्रावर केवळ ४५ वर्षावरील नागरीकांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे.

त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या व्यतिरिक्त कोणी ही गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे  सकाळी १० ते ४ या वेळात या केंद्रांवर (Vaccination Center) लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शहरातील ४५ वर्षावरील कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांसाठी लसीकरण केंद्र 


१)  नाशिकरोड  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खोले मळा