सर्वात वर

आज नाशिक शहरातील कोणकोणत्या लसीकरण केंद्रावर मिळणार लस

ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरीकांनाच मिळणार लस : दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य 

नाशिक – नाशिक महानगर पालिका हद्दीत आज (दि.७ मे २०२१) कोरोना प्रतिबंधक लस (Vaccines) मिळणार असून नाशिक महानगर पालिकेने या लसीकरण केंद्राची (Vaccination Centers in Nashik City) यादी प्रसिद्ध केली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांना नागरीकांना प्राधान्य देण्यात येणार असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरीकांनाच लस मिळणार असल्याचे नाशिक महानगर पालिके तर्फे सांगण्यात आले आहे. 

सकाळी १० ते ४ या वेळात खालील केंद्रावर नागरीकांना लसीकरण करता येणार असून ज्या नागरीकांनी या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केली आहे. अशाच नागरीकांना लस मिळणार आहे.नोंदणी केलेल्या नागरीकांनी दिलेल्या वेळेतच यावे तसेच ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांनी लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये असे हि आवाहन नाशिक महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे 

लसीकरण केंद्राची यादी (Vaccination Centers in Nashik City)