सर्वात वर

१८ वर्षावरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण :केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला असून येत्या १ मे पासून १८ वर्षा वरील प्रत्येकाला लस (Vaccination) मिळणार आहे.त्याच बरोबर लस उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना राज्य सरकारला ५० टक्के साठा द्यावा असेही सांगण्यात आले आहे.कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लसीकरणाचा  (Vaccination) हा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. 

लसीकरणासाठी वयाचे बंधन नसावे १०० टक्के लसीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.

या आधी ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत होते.मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने केंद्रसरकारने १८ वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाचा (Vaccination) निर्णय घेतला आहे. 

आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.