सर्वात वर

आज नाशिक शहरातील या १७ लसीकरण केंद्रावर मिळणार लस

नाशिक – नाशिक शहरात आज (१५ मे २०२१) ४५ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण सुरु आहे.ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना खालील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center)लस मिळणार आहे.नाशिक महानगर पालिकेने  १७ लसीकरण केंद्राची (Vaccination Center) यादी जाहीर केली असून आज कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन चे दुसरे डोस  खालील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) सकाळी १० ते ४ या वेळात मिळतील असे महापालिके तर्फे सांगण्यात आले आहे. 

‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांनी दिला जाणार नागरिकांनी लसीकरणासाठी विनाकारण  गर्दी करू नये; ‘कॉव्हॅक्सिन’च्या प्रोटोकॉलमध्ये कुठलेही बदल नाहीत : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

 पहिला डोस घेवून ८४ दिवस झालेल्यांनाच मिळणार कोविशिल्ड चा दुसरा डोस
 कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार ४ ते ६ आठवड्यांनी
 ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी पहिल्या डोस साठी लसीकरण सुरू राहील
 १८ ते ४४ वयोगटासाठींच्या नागरिकांचे लसीकरण शासनाचे पुढील आदेश मिळेपर्यंत
स्थगित

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे, त्यामुळे आजपासून (१५ मे) ज्यांनी कोविशिल्ड चा पहिला डोस घेवून ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांनाच दुसरा डोस दिला जाईल उर्वरीत ज्यांचा विहित १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला नसेल त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही,त्यामुळे कोविशिल्ड चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या लसीसाठी घाई करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

या संदर्भात उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचे घटना व्यवस्थापक गणेश मिसाळ यांनी यासंदर्भात दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात कोवीड १९ प्रतीबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोवीड-१९ प्रतीबंधात्मक लसीकरणाबाबत नवीन संशोधनास अनुसरुन केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नव्याने प्राप्त सुचनांनुसार यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे अंतर ६-८ आठवड्यांवरून १२-१६ आठवडे इतके ठरवण्यात आलेले आहे. म्हणजेच ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देय राहील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे

कोव्हॅक्सिनच्या प्रोटोकॉलमध्ये कुठलाही बदल नाही

कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या यापूर्वीच्या प्रोटोकॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच ४-६ आठवड्याने देण्यात येईल. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या पहिला डोसला ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येईल व ४५ वर्ष व त्यावरील वयोगटापुढील उर्वरीत लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व पात्र लाभार्थ्यांनीच लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) जावे . १८-४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे राज्य शासनाच्या प्राप्त सुचनांनुसार सध्या लसीकरण थांबवण्यात आलेले असुन पुढील सुचना प्राप्त झाल्यावरच त्यांचे लसीकरण सुरु करण्यात येईल त्यामुळे नागरीकांनी लसीकरण केंद्रावर (Vaccination Center)  गर्दी करु नये. या संदर्भात कोविन पोर्टलवर सुद्धा आज पासून (१५ मे) ही माहिती अपडेट करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी म्हटल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी आपल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

दुसऱ्या डोस साठी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी खालील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center)लस मिळेल (कोविशील्ड)

१) रामवाडी (UPHC)
२) सिडको  (UPHC)
३)पिंपळगाव खांब  (UPHC)  

४)  स्वामी समर्थ हॉस्पिटल ,मोरवाडी 
५) गंगापूर  (UPHC)  

६) मखमलाबाद  (UPHC)  
७) मायको पंचवटी  (UPHC)  
८) सिन्नर फाटा  (UPHC)  
९) जिजामाता   (UPHC)  
१०) म्हसरूळ  (UPHC)  
११) JDC बिटको हॉस्पिटल 
१२) तपोवन  (UPHC)  
१३) वडनेर  (UPHC)  
१४ ) गोरेवाडी  (UPHC)  
१५) संजीव नगर  (UPHC)  

कोव्हॅक्सीन चे दुसरे डोस खालील केंद्रावर (Vaccination Center) मिळतील 

१)  इंदिरागांधी हॉस्पिटल, पंचवटी 
२) नाशिकरोड  (UPHC) खोले मळा