सर्वात वर

नाशिक शहरात आज कोणकोणत्या लसीकरण केंद्रावर मिळणार लस

नाशिक – नाशिक शहरात आज लसीकरण मोहीम सुरु राहणार असून आज  शहरातील नागरिकांना (हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन हेल्थ वर्कर. ६० वर्षापुढोल ४५ वर्ष ते ५९ वर्षापर्यंत व १८ ते ४४ वयोगटापर्यंत) कोव्हॅक्सीन व कोव्हीशील्ड ही लस नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये लस (Vaccination Center)देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये मा. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना  कोविड १९ लसीकरण करण्यात येणार असून सदर वयोगटातील नागरिकांचे मंगळवार दि.११/०५/२०२१ रोजी पुढे लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे. 

नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे.अशा नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.तसेच कोव्हॅक्सीन तीन विभागात विशेष केंद्र राखीव (Vaccination Center)ठेवले असून त्या ठिकाणी केवळ कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच लस मिळणार आहे. असे महानगर पालिके तर्फे सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी आरोग्य सेतू किंवा https://www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून Appointment / slot बुक करणं बंधनकारक असणार आहे. या  संकेतस्थळावर Appointment / slot नोंदणी रोज रात्री ०८.०० ते ०८.३० वाजे दरम्यान सुरू राहिल. नाव नोंदणी झाल्यानंतर खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या केंद्रांवर(Vaccination Center) संबंधितांना लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंद न करता थेट जाऊ नये तसंच नाव नोंदणी केलेली नसल्यास नागरिकांना लस देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.  

कोण कोणत्या लसीकरण केंद्रांवर मिळणार लस  नाशिकमधील लसीकरण केंद्र 


४५ वर्षावरील नागरीकांनी कॉव्हॅक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी लसीकरण केंद्र