सर्वात वर

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishore Nandalskar) यांचं आज कोरोनामुळे निधन झालं आहे. गेले चार दिवस ते ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. ते  ७५वर्षाचे होते, त्यांच्या पश्चात  पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित मुलं आहेत, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. २०१६ मध्ये त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आलं होत.  त्यांची ‘बायपास’ झाली होती मात्र यातुनही ते सावरले होते मात्र कोरोनामुळे त्यांच आज निधन झालं. 

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर (Kishore Nandalskar) यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ,चाल जाए पर वचन न जाए,’ ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या.   

अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishore Nandalskar) यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदी सिनेमा आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.

‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

_________________

भावपूर्ण श्रद्धांजली

…. अखेर सन्नाटा पसरलाच 

मराठी रंगभूमी चित्रपट मालिका तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठअभिनेते श्री किशोर नांदलस्कर यांचे आज दुःखद निधन झाले. हिंदी चित्रपट विशेषतः वास्तव,खाकी, सिंघम, जिस देश में गंगा रेहता है या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. 
माझे मित्र कवी गीतकार संतोष हुदलिकर यांच्या मुळे त्यांच्याशी माझा परिचय झाला माझ्या निवासस्थानी देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली होती नंतरच्या काळात छान मैत्री देखील झाली. एव्हडे मोठे अभिनेते असूनही किशोर जी अत्यंत साधे आणि गप्पावेल्हाळ होते.किशोर जी ना फोन केल्यावर ते शूट मध्ये असतील तर नंतर आवर्जून फोन करावयाचे.

किशोरजीना भावपुर्ण श्रद्धांजली

ॲड. अभिजित बगदे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिक
प सा नाट्यगृह सचिव, सार्वजनिक वाचनालय नाशिक