सर्वात वर

ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

नाशिक – ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक वसंतराव हुदलीकर(Vasantrao Hudalikar) यांचे पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले ते ९७ वर्षांचे होते.वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. 

अखंड समाजसेवा आणि उच्च सामाजिक बांधिलकीपोटीच वसंतराव हुदलीकर यांनी मरणोतर देहादान करून समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे.

श्रद्धांजली !
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर (Vasantrao Hudalikar)यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत दुःख झाले. मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले कै. वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता. महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

भावपूर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ

मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा

____________

भावपूर्ण आदरांजली


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कट्टर गांधींवादी अखेरच्या श्वासापर्यंत निरलस व निरपेक्ष भावनेने काम केलेले थोर समाजसेवक नाशिक चे भूषण आदरणीय वसंतराव तथा बाबा हुदलीकर यांचे देहावसान झाल्याचे वृत्त समजले आणि आठवणींचा पट डोळ्यांसमोरून उलगडत गेला. बाबांचा आणि आमच्या कुटुंबाचा जुना ऋणानुबंध…..

माझ्या आई -वडिलांचा विवाह १९७० ला बाबांच्या मध्यस्थीने नोंदणी पद्धतीने झाला. बाबांचा ए बी सी लॉंड्रीसमोर फावडे गल्लीच्या तोंडावर वह्या -पुस्तके स्टेशनरीचे दुकान होते त्यामुळे पहिली ते दहावी पर्यंत हर एक प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदीचे आमचे जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे बाबांचेच दुकान त्यांना कायमच मी खादी च्या पोशाखातच बघत आलेलो मला कायमच त्यांचे हक्काचे मार्गदर्शन लाभत गेले आज आमच्या घरातीलच एक ज्येष्ठ व्यक्ती गेल्याचे दुःख मोठे आहे. अखंड समाजसेवा आणि उच्च सामाजिक बांधिलकीपोटीच बाबांनी मरणोतर देहादान करून समाजासमोर मोठा आदर्श उभा केलाआदरणीय बाबांना नमस्कार आणि भावपूर्ण आदरांजली

-ॲड. अभिजित बगदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकनाट्यगृह सचिव सार्वजनिक वाचनालय नाशिक