सर्वात वर

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून डॉ. शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

डॉ. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.