सर्वात वर

विजया दुधारे यांच्या काव्यसंग्रहाचे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुकमध्ये नोंद

नाशिक – नाशिकच्या कवयित्री सौ.विजया दुधारे यांच्या “हिरे जडित महाराष्ट्र” या काव्य संग्रहाचे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या(World Record India) बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे. ६० व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रतील ६० उत्तुंग व्यक्ती च्या नावाची आद्यक्षरे घेऊन त्यांच्या जीवनावर  त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या कविता त्यांनी या काव्यसंग्रहात त्यांनी केल्या आहे. त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड झाले नुकतेच त्यांना या रेकॉर्ड बद्दल  प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया चे महाराष्ट्र प्रतिनिधी दिनेश पैठणकर, सौ.विजया दुधारे, त्यांचे पती, व अतुल वर्तक उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या (World Record India) बुकमध्ये नोंद होणारे कवितांचे हे पहिलेच मराठी साहित्य आहे.       

मागील लॉक डाउन मध्ये लिहिण्यास सुरवात केली आणि १ मे २०२० रोजी हा काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.  त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या बुक मध्ये करण्यांत आली. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या बुकमध्ये नोंद झाल्या बद्दल कवयित्री विजया दुधारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.