सर्वात वर

पोलिस आयुक्तांच्या सल्लागार समितीवर विश्वास ठाकूर आणि डॉ.वैशाली बालाजीवाले

नाशिक– नाशिक येथे २६ मार्च ते २८ मार्च दरम्यान होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक शिवानंद पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे. या समितीमध्ये लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री विश्वास ठाकूर  आणि डाॅ. वैशाली बालाजीवाले हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत. 

साहित्य संमेलनात होणाऱ्या  विविध कार्यक्रम,मिरवणुक आदींची परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था इ.विषयांवर ही समिती विचार करणार आहे. या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,  कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन,  अन्न व औषधे प्रशासन यांचे ही प्रतिनिधी आहेत. .