सर्वात वर

महाराष्ट्राही थंडीच्या लाटेने गारठणार प्रा.किरणकुमार जोहरे यांची माहिती

Weather Forecast : अंदाज नव्हे माहिती! : थंडीने गारठणार्या महाराष्ट्रासाठी प्रा. किरणकुमार जोहरे यांचा ‘हेल्थ अलर्ट’! 

घाबरून न जाता नागरीकांनी घ्यावी आरोग्याची काळजी

नाशिक – (Weather Forecast) जम्मू-काश्मीर, लडाख, सिमला व देशाच्या राजधानीसह देशातील राज्याराज्याच्या ठिकाणी तापमानात मोठी घट झाली आहे. दिल्लीचे तापमान देखील आता ३ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे ‘कोल्ड शॉक’ च्या झटक्याने मोठ्या प्रमाणात लोकांच्या आजारापणात वाढ होते आहे. चढ उतार होत पुढील किमान १० दिवस महाराष्ट्रातील जनतेला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा थंडीचा उतरता क्रम राहणार आहे. नाशिक सह नागपूर, मुंबई , पुणे आदी ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली येणार आहे अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ तसेच ‘अंदाज नव्हे माहिती!’ या विनामोबदला – विनाअनुदानित सेवेचे प्रणेते प्रा. किरणकुमार जोहरे यांनी जनस्थानला दिली आहे.


(Weather Forecast) महाराष्ट्रातील नागरीकांसाठी त्यांनी ‘हेल्थ अलर्ट’ जारी करतांनाच घाबरून न जाता आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. उत्तरेकडून येणार्या वार्याचा (वेस्टर्न डिस्टर्बन्स) वेग मंदावणे व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आतापर्यंत जानेवारी महिन्यात तापमानात चढ उतार होत होते असे शास्त्रीय कारण असल्याची माहिती देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. 

… कारण देखील अशी असेल ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडी! (Weather Forecast)

महाराष्ट्रातील विविध शहरात ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडी पुढील काही दिवसात पडल्याचे दिसून येईल. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणार आहे. यामध्ये मुंबई चा पारा १० अंशाच्या खाली तापमानात घसरू शकेल. तर पुणे ७, नाशिक ७, औरंगाबाद ५, नागपूर ६, कोल्हापूर  ८ सेल्सिअस खाली जाण्याची शक्यता देखील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी वर्तवली आहे. 

द्राक्ष आणि केळी आदी पिकांसाठी हे आहेत उपाय! 

वाढत्या थंडीचा प्रभाव लक्षात घेता द्राक्ष आणि केळीच्या पिकांची शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र थंडीचा कडाका जास्त वाढल्यास ‘कोल्ड शाॅक’ पासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकर्यांनी मुळीच घाबरून जाता पारंपरिक उपाय करणे शक्य आहे. केळीच्या पिकांना गोनपाट किंवा बारदान गुंडाळणे तर शेतात पाणी भरत द्राक्षपिकांची काळजी असे साधे उपाय आपल्या अनुभवानुसार करता येऊ शकते असे हि प्रा. जोहरे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रासाठी ‘हेल्थ अलर्ट’

महाराष्ट्रात अनेक भागात पारा झपाट्याने खाली येणार असल्याने विशेषतः वयस्क नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांनी तसेच मधुमेह, हृदयविकार आदी रुग्ण नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हि प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. 

पावसाची शक्यता नाही 

महाराष्ट्रातील वातावरणात सध्या कोरडे असून हवेची आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे हेच संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कुठल्याही परिस्थितीत पाऊस न होण्यामागचे वैज्ञानिक कारण आहे असे ही भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Prof.-KiranKumar-Johare
प्रा. किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ 

प्रा. किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ 

Mobile – 9970368009, 9168981939 

[email protected] 

www.kirankumarjohare.org 

Facebook Id Kirankumar Kiku