सर्वात वर

Weather Forecast : यंदाच्या वर्षी कसा असेल मान्सून : हवामान खात्यानं दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली – देशभरात मोठा प्रमाणावर कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रा सहित देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना अशा दुहेरी कात्रीत सापडला होता.पण हवामान खात्याने सर्वांसाठी एक दिलासा दायक बातमी दिली आहे. यंदाच्या वर्षी मान्सून  दिलासादायक असून देशात चांगला पाऊस पडेल असा अंदाज (Weather Forecast) हवामान खात्यानं वर्तवला आहे.

भारतात  मागील तीन वर्षांपासून पावसाची स्थिती सामान्य आहे. भारतात दरवर्षी साधारणतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. यावर्षी देखील ही स्थिती कायम राहणार असून ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. ९६ ते १०४ टक्के दरम्यानचा पाऊस हा आपल्या देशात सामान्य पाऊस मानला जातो. यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता नाही, असा अंदाजही (Weather Forecast) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या या नव्या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षीचा मान्सूनबाबतचा दुसरा अहवाल (Weather Forecast) मे महिन्यात जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर देशातील मान्सून स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकेल  

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी 

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातही सरासरी पेक्षा अधिक पाऊस होणार आहे.असे हवामान खात्याने सांगितलेआहे. गेल्यावर्षभरातही महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतातील साधारणतः ६५ टक्के लोकसंख्या अजूनही शेतीशी निगडीत व्यवसाय करतात. यातील बहुतांशी शेतकरी मान्सूनच्या पावसावर शेती करतात.कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक मोलाचं ठरणार आहे.