Weather Today : संपुर्ण महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट

कुम्युलोनिंबस ढगांची निर्मिती झाल्यानंतरच कडाडतील विजा व पावसाबरोबर गारा, शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये : हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे
मुंबई :- (Weather Today) उत्तर भारतात जम्मू, काश्मीर आणि लदाख आदी भागांत मोठया प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. उत्तर भारतात हाडे गोठणारी कडाक्याची थंडी पडली आहे त्यात प्रामुख्याने राजधानी दिल्लीचे तापमान १ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरले आहे. राजस्थान मध्ये माऊंट अबूचा तापमानाचा पारा उणे ४.४ अंश सेल्सिअस इतका कमी झाला आहे. महाराष्ट्रात अनेक भागात ढगाळ वातावरण व दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू गोठल्याचे दिसून येत आहेत. यामागे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. राज्यात येत्या आठवड्यात ‘कुम्युलोनिंबस’ (क्युमोलो म्हणजे उर्ध्वदिशेने वरती वाढत जाणारा आणि निंबस म्हणजे पाणी असलेला) ढगांची निर्मिती झाल्यानंतरच पाऊसा बरोबर गारा पडू शकतात. साधारणपणे १२ जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात पाउस पडू शकतो.अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
(Weather Today) बदलत्या वातावरणाचा सामना करतांना उपाय काय ?
शेतात कांदा ,द्राक्ष तूर, पीक तयार झाले असेल तर त्याची काढणी करून ती सुरक्षित ठिकाणी साठवावीत. तसेच या वातावरणात देशी बियाणे व सेंद्रिय खतांचा वापर करावा. आगामी काळात थंडी वाढण्यार आहे आणि मुंबईचे तापमान १२ अंश सेल्सिअस तर नाशिक सह पुण्याचे तापमान ६ अंश सेल्सिअसच्या खाली घसरू शकते अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ तसेच ‘अंदाज नव्हे माहिती!’ चे प्रणेते प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी :
प्रा किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ
Mobile – 9970368009, 9168981939
www.kirankumarjohare.org
Facebook Id Kirankumar Kiku
