सर्वात वर

शेअर बाजारातील साप्ताहिक घडामोडी ! कसा असेल पुढचा आठवडा !

जाणून घ्या जागतिक शेअर बाजाराचे वेळापत्रक

विश्वनाथ बोदडे,नाशिक

मागील आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी (Stock Market) खूप चांगला राहिला असे म्हणता येईल, त्याच बरोबर याचे वर्णन कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचे सुद्धा करावे लागेल, कारण बाजार तीन दिवस सकारात्मक तर दोन दिवस नकारात्मक राहिल्या मुळे बाजारामध्ये संमिश्र असे वातावरण दिसत होते. 

याला मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारामधून (Stock Market) जसे संकेत येत होते त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसत होते. स्थानिक स्तरावर सुद्धा ज्या कंपन्या शेअर बाजारांमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांचे तिमाही निकाल काही प्रमाणात सकारात्मक आल्यामुळे त्याचे पडसाद बाजारामध्ये कभी खुशी कभी गम याप्रमाणे उमटले परंतु मागील आठवड्यामध्ये बाजाराला खऱ्या अर्थाने सकारात्मक ठेवण्यामध्ये बँकिंग व मेटल या क्षेत्रांच्या समभागांमध्ये दिसलेल्या खरेदीमुळे बाजार (Stock Market) मागील काही आठवड्यांच्या तुलने मध्ये मागच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारे सकारात्मक बंद होण्यास यशस्वी ठरला ,त्याचाच परिणाम आपल्याला राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक NIFTY  497 एवढ्या अंकांनी वधारकेला दिसला ,तर मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX 18 08 एवढ्या अंकांनी वधारला व 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला BANK NIFTY हा निर्देशांक तब्बल 24 37 एवढ्या अंकानी वधारला 

मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चुअल करन्सी मध्ये मोठ्या प्रमाणावर घट बघायला मिळाली, बिटकॉइंन, इथेरेऊम  सारख्या विविध क्रिप्टो करन्सी च्या किमती अवघ्या 24 तासांत तब्बल 40% टक्क्यांनी कमी झाल्या होत्या , एका Bitcoin चे मूल्य त्याच्या विक्रमी $60,000 वरून $31,000 वर येऊन ठेपले होतें , परंतु दुसऱ्या दिवशी ह्या किमती काही प्रमाणात वधारल्या होत्या,

बाजाराचे जाणकार सांगत आहेत की बाजाराची (Stock Market) दिशा पुढील आठवड्यात सुद्धा VOLATILE राहू शकते परंतु विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या लॉक डाउन काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याच बरोबर करोना रुग्ण संख्येमध्ये घट सुद्धा दिसून येत आहे आणि जून व जुलै मध्ये लसीकरण मोहीम अजून वेग पकडेल असे संकेत मिळत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक बाय ऑन डीप ह्या तंत्राच्या आधारे चांगल्या प्रतीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करत रहावे.

आंतरराष्ट्रीय मुख्य शेअर मार्केट ( इंडेक्स ) आणि त्यांचे वेळापत्रक


युरोप मार्केट

1) इंडेक्स :- FTSC 100  देश :- इंग्लंडवेळ :- दुपारी 1:30 ते रात्री 10:00
2) इंडेक्स :- CAC 40देश :- फ्रान्स वेळ :- दुपारी 12 :30 ते रात्री 10:45
3) इंडेक्स :- DAXदेश :- जर्मनी वेळ :- दुपारी 1:30 ते रात्री 08:00

 अमेरिका मार्केट  

1) इंडेक्स :- DOW JONES & INDUSTRIAl AVG.देश :- अमेरिका वेळ :- रात्री 08:00 ते रात्री 2:30

 एशियन  मार्केट  

1) इंडेक्स :-AUSTRALIA 200 देश :- ऑस्ट्रेलिया वेळ :- सकाळी 4:00 ते सकाळी 10:30 
2) इंडेक्स :-SANGHAI COMP. देश :- चायना वेळ :- सकाळी 7:00 ते दुपारी  12:30
3) इंडेक्स :-HONG SENG देश :-हॉंगकॉंग वेळ :- सकाळी 7:00 ते दुपारी  01:30
4)  इंडेक्स :-NIKKEI 225देश :- जपान वेळ :- सकाळी 5:30 ते सकाळी  09:00 परत एकदा उघते सायंकाळी  7:30 ते रात्री 11:30
 5) इंडेक्स :- NIFTY / SENSEX देश :- भारत वेळ :- सकाळी 09:00ते दुपारी   3:30

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक


संपर्क-88 88 280 555