सर्वात वर

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

पुणे – राष्ट्रीय चित्रपट विजेत्या  दिग्दर्शिका सुमित्रा भावे (Sumitra Bhave) यांचे आज पुण्यात निधन झाले त्या ७८ वर्षांच्या होत्या.बऱ्याच काळा पासून त्या आजारीच होत्या आज पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे.सुमित्रा भावे (Sumitra Bhave) केवळ एक दिग्दर्शिकाच नव्हत्या, तर कित्येक कलावंतांना, विद्यार्थांना, गरीबांना मदत करणाऱ्या त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या. 

सुमित्रा भावे (Sumitra Bhave) या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपटआणि चार मालिकांची निर्मिती केली. यामध्ये प्रामुख्यानं ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट विशेष गाजले. या चित्रपटांसाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं मनोरंजनसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटीं सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.