सर्वात वर

सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक प्रशांत हिरे यांचे निधन

नाशिक – सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अभिनेते प्रशांत हिरे (Prashant Hiray) यांचे आज दुपारी निधन झाले. काही दिवसा पूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर देवळाली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.कोरोनातून ते काही दिवसापूर्वी बरे हि झाले होते परंतु त्यांना श्वसनाचा त्रास सुरु असल्याने रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.प्रशांत हिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. 
त्यांच्या निधनाने नाशिकच्या कालक्षेत्राचे कधी न भरुनयेणारे मोठे नुकसान झाले आहे.