सर्वात वर

कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी

 जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जाहीर केली नियमावली 

नाशिक – जिल्ह्यातील लॉक डाऊन शिथिल केल्या नंतर सोमवार पासून जिल्ह्यातील बाजार समित्या (Agricultural Produce Market Committee) सुरु केल्या जाणार आहे. परंतु काही मंडळी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये येताना दर ८ दिवसांनी RTPCR टेस्ट करावी लागणार आहे अशी खोडसाळ माहिती पसरवत आहेत.ही माहिती चुकीची असून अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. असे स्पष्टीकरण  जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहे. 

आज जिल्हाधिकाऱ्यांनी  कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) सुरू करण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी या बाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे 

काय आहे नियमावली 

१. आस्थापने मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची RT PCR अथवा RAT चाचणी 15 दिवसांचे आत करून घेणे संबंधित आस्थापनेवर बंधनकारक राहील. 

२ बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे. 

३ संपूर्ण बाजारात दररोज नियमितपणे सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी करण्यात यावी. 

४. बाजार समिती आवारात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे तापमान नोंदवण्याची तसेच संबंधित व्यक्तींनी मुख्य पट्टी (मास्क) योग्य प्रकारे परिधान केली आहे किंवा कसे? याची तपासणी करण्याची व्यवस्था करणे अनिवार्य राहील. 

५ बाजार समितीत विविध गावांमधून व्यक्ती येत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या व्यक्ती पैकी जास्तीत जास्त व्यक्तींची कोविड तपासणी करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील. त्यासाठी बाजार समितीच्या आवारात RAT तपासणी करण्याची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी. 

६. शारीरिक अंतर व कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे योग्य ते पालन होण्याच्या दृष्टीने स्थानिक जागेची उपलब्धता विचारात घेऊन किती वाहनांना व किती व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा याबाबत बाजार समितीने संख्या निश्चित करणे अनिवार्य राहील व त्या मर्यादेतच प्रत्यक्ष प्रवेश दिला जाईल याकरीता आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील.

७. बाजार समितीच्या आवारात किरकोळ शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहतील, 

८. बाजार समितीतील सार्वजनिक वापराची सर्व ठिकाणी उदाहरणार्थ विश्राम व्यवस्था स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा येणाऱ्या व्यक्तींना गर्दा न करता पुरेशी राहील याबाबत संपूर्ण काळजी घेणे अनिवार्य राहील. त्याकरीता आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे व त्या स्वच्छतागृहांची कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने देखभाल करणे अनिवार्य राहील. 

९. वरील मुद्दांची पूर्तता बाजार समिती करीत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा. 

१०. वरील पैकी कोणतेही मुद्द्यांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास संबंधित आस्थापना कोरोना विषयक अधिसूचना मागे घेतली जाईपर्यंत बंद ठेवण्यात येईल.