सर्वात वर

कोहळ्याचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ७)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

कोहळा (Winter Melon) हे फळ बऱ्याच जणांना परिचित नसते असलेच तरी ते खूप कंमी लोकांना खाण्यात वापरले जाते एवढे माहित असते.तर काही जणांना पूजेमध्ये वापरले जाते या करिता माहित असते.

कोहळ्याची (Winter Melon) वेल असते.यास पिवळी फुले असून उन्हाळ्यात फळे येतात. यास कुष्मांड,wax gourd, ash gourd, white gourd, tallow gourd, ash pumpkin, winter melon असेही म्हटले जाते.याचा उपयोग औषधे व आहारात केला जातो.याने शक्यतो काहीही त्रास होत नाही.त्यामुळे हे वेलीफळामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते.आयुर्वेदात याचा पुरेपुर उपयोग दर्शवलेला आहे.बार्शी,पंढरपूर याचे उत्पन्न काही टनांमध्ये घेतले जाते.थोडे महाग परंतु आरोग्यदायी अश्या या बहुमुल्य फळाची माहीती आज आपण घेणार आहोत.

कोहळ्याचे (Winter Melon Health Benefits) आरोग्यास फायदे

१.ज्या व्यक्तींना वारंवार बध्दकोष्ठतेचा त्रास होतो.अश्यांना कोहळा किसून तूपात परतून जेवणासह  खाल्ल्यास त्रास कमी होतो.

२.डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे,डोळे दुखणे यामध्ये अश्या तक्रारींमध्ये कोहळ्याच्या रसाच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.

३.जिना चढ्ताना दम लागणे,छातीत धडधडणे,विनाकारण भीती वाट्णे,सतत तहान लागणे,ह्र्द्यरोगा सारख्या गंभीर आजारात ह्रद्याच्या स्नायूंना बळ देण्यासाठी त्यांची ताकदा वाढवण्याकरीता रौप्ययुक्त ताप्यादी लोह कोहळा रसातून द्यावे.

४.लघवी अडकण्याचा त्रास असल्यास जिरेपुड व कोहळा रस एकत्र द्यावा

५.वजन वाढत नसल्यास कोहळे पाक उत्तम काम करतो.

६.कोहळ्याचा रस.खडीसाखर,गव्हाचे सत्व हे मिश्रण उपाशीपोटी घ्यावे व व्यायाम करावा याने उत्साह वाढतो,शुक्रधातु घट्ट होतो,वजन भरते.

७.नाकातून रक्त पडत असण्याची सवय असल्यास कोहळ्याच रस नाकात टाकावा,तसेच लघवीतून रक्त पडणे,मुळव्याधात रक्त पडणे या तक्रारी असल्यास कोहळा व आवळा रस सकाळी द्यावा. 

८.शरीरावरील त्वचा ड्राय पडणे,तळपायांना भेगा पडणे यामध्ये कोहळ्याचा रस व किस वापरावा.

९.जुना खोकला असल्यास कोहळापाक जेवणासह खावा

१०.फुप्फुस,ह्रद्य.मूत्रपिंड यातील विषारे काढायचे असल्यास व त्यांचे बळ वाढवायचे असल्यास कोहळा जरूर खावा.

११.कोहळयाचे बी दुधात व लोण्यात वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर केल्यास चेहरा तजेलदार होतो.मुरुम,वांग,डाग येत नाही.

१२.कोहळ्याची साल केसाचे आरोग्य टिकवण्यास उपयुक्त आहे.

१३.कोहळेपाक क्षयरोग,शुक्रधातु कमी होणे,नपुंसकता,मंदाग्नी यात वापरावा,यात कोहळाचा रस,विलायची,जायफळ,साखर,गाईचे तूप,पिंपळी,जिरे,सुंठ,मिरे,मध वापरून याचा उत्तम पाक करून वापरावा

टीप – वरील सर्व प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०