सर्वात वर

देवमाणूस – एक रंजक मर्डर मिस्ट्री !

२ तासांचा विशेष भाग : येत्या रविवारी ३० मे संध्या. ७ वा

मुंबई – झी मराठी (Zee Marathi)वरील देवमाणूस ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिके विषयी रसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. येत्या रविवारी ३० मे संध्या. ७ वा झी मराठीवर (Zee Marathi) या मालिकेचे २ तासाच्या विशेष भागात ही रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आज पर्यंत अजित ने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिम्पल कडे देणार आहे का ? याची उत्तरे रसिकांना मिळणार का ?

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या ‘किरण गायकवाड’ याने आपल्या अभिनयाने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिकली आहेत. 

आता , आता जसं डिम्पल आणि अजित ह्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे, तसंच या लग्नात दिव्या खोडा घालणार की सरू आज्जी राडा करणार? डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग सोबत डिम्पल ला सुद्धा अटक होणार का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय. २ तासांचा विशेषत्यामळे पाहायला विसरू नका देवमाणूस – एक रंजक मर्डर मिस्ट्री ! २ तासांचा विशेष भाग ३० मे रविवार संध्या. ७ वा. झी मराठीवर (Zee Marathi) रसिकांना बघता येणार आहे.