सर्वात वर

Dev Manus : मंजु दीदींच्या मदतीला टोण्या आणि गँग

देवमाणूस या मालिकेतील रंजक पात्र आणि रहस्यमयी कथानकामुळे ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणित मालिकेत उत्कंठा वाढत आहे. येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यामधील चुरस अधिकाधिक रंगत जाणार असे दिसते आहे.

झी मराठी वरील देव माणूस या मालिका जरा वेगळे वळण घेते आहे.गावात आलेली मंजुळाची अजितला भूरळ पडलीये. पण मंजुळाचा परखडपणा आणि तिच्यात असलेल्या स्वावलंबी गुणा यमुळे अजितच्या जाळ्यात ती सहजासहजी अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान अजितच्या जिव्हारी लागतो मग अजित सगळ्यांना बोलवून सांगतो की मंजूच्या घरी तिनेकाहीतरी दडवलेलं आहे. तिथे तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो.

म्हातारीला या सर्वगोष्टींची कल्पना येत असते.  म्हातारी  जनाला म्हणते असं असल तर आपण पण जाऊ आणि त्या डॉक्टरला चांगलाच धडा शिकवू .टोण्या आणि गँगही तयार होते मंजु दीदीच्या मदतीला जायचं असे ठरवतात. डिंपल क्रीशला सांगतेय आज राडा होणारे, डॉक्टरला कॉन्फिडन्स आहे की आता तो मंजुचं पितळ उघड पाडेल.तो सर्वांना सांगतो की बघा नक्की काहीतरी गडबड आहे. तितक्यात मंजुच्या घराचा दरवाजा उघडला जातो. मंजु दिसते. आणि तिच्या सोबत तिचा व्हिलचेअरवर बसलेला नवरा, सगळे अचंबित होतात. मंजू आणि नवरा हसताहेत. डिंपल तर चकीतच होते, इकडे अजितची मात्र चांगलीच नाचक्की होते.

 डॉक्टर अजित यांची गावात नाचक्की हते आणि डॉक्टर अजित  गावातून गायब होतो सगळं गाव डॉक्टरला शोधतंय, पण डॉक्टर सापडत नाही. मंजू वाड्यात येते..सगळे मंजूवर संशय घेतात. मंजूवर आरोप होतो…मंजू सर्वाना  समजवायचा अतोनात  प्रयत्न करतेय पण पोलिस मंजूला चौकशी साठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात.