
डॉ.अजित कुमार देव आणि डिम्पलची लगीनघाई
देवी सिंग अटकेची उत्सुकता, पुरावे ACP दिव्याच्या हाती !
मुंबई – झी मराठीवरील(Zee Marathi) देवमाणूस हा नवी मालिका अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय देवीसिंग ला अटक कधी होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय, तसंच डॉ. सोबत डिम्पल ला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार का ? असे असंख्य प्रश्न रसिकांना पडले आहेत.
अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली आहे तर दुसरीकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी ह्या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंगला कधी अटक होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय,

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. ‘देवमाणूस’ ही लोकप्रिय मालिका झी मराठीवर (Zee Marathi) रसिकांना सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा बघायला मिळणार आहे.
