सर्वात वर

देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती !

देवमाणूस मालिकेत डॉ. अजितकुमार देवला लागणार झटका…

मुंबई- झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका सध्या रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा प्रवृत्ती विषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला भेटल्यावर ती आपल्याला देवासमान वाटते पण वास्तवात त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. ते या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना बघायला मिळते आहे. या मालिकेतील काही पात्र रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.मालिकेतील सरू आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्रघराघरात लोकप्रिय झाली आहेत.

झी मराठीवरील (Zee Marathi) हि लोकप्रिय मालिका आता एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंग ला शोधण्यासाठी ACP दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय, दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते. रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.