सर्वात वर

काऊंसिलर ते अभिनेत्री उमा पेंढारकरचा प्रवास

अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत उमा पेंढारकर 

मुंबई – झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.आता या मालिकेच्या जागी ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु होते  आहे.अग्गबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत उमा पेंढारकर हा नवीन चेहेरा दिसणार आहे. मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे त्या विषयी जाणून घेऊया  

शुभ्राची व्यक्तिरेखा साकारताना मनात काय भावना होती –

जेव्हा झी मराठीकडून (Zee Marathi) या मालिकेची ऑफर आली तेव्हा मलाही असाच प्रश्न पडला होता, अभिनेत्री  तेजश्री  प्रधान खूप सिनियर आणि मोठी अभिनेत्री आहे, पण मी ह्या मालिकेत रिप्लेसमेंट म्हणून आलेली नाही, ह्या शुभ्राचं रूप तिच्यापेक्षा खूप वेगळं आहे.  मालिकेतील  शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हा दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, ही शुभ्रा रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. 

काऊंसिलर ते अभिनेत्री –

डोंबिवलीकर असल्येल्या उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे.अद्वैत दादरकारचे आई-वडील  शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचे शिक्षण घेतले आहे.त्यात उमा पहिली आली.ज्येष्ठ अभिनेते  प्रशांत दामलेंकडून तिला  हा पुरस्कार मिळाला.आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला  नंतर तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं. याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंग चं काम मोठया जबाबदारीनं करते. 

पहिल्या दिवसापासून आपलेपण जाणवलं –

आपल्या प्रतिक्रियेत उमा पुढे म्हणाली अग्गबाई सासूबाईचीच संपूर्ण टीम या नव्या मालिकेत आहे, केवळ मी आणि अद्वैत दादरकर वगळता इतर बरेचजण तेच आहेत. त्यामुळे त्यांची एक भट्टी जमली आहे. यात आपण सहभागी होऊ शकू का? असा प्रश्न सुरवातीलामनात आला होता , पण पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांनी आपलेपणा दाखवला नवखेपण कधी जाणवलाच नाही. निवेदिता ताई असोत गिरीश ओक असोत किंवा मोहन जोशी सर, हे सर्वजण इतके मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करतानाआनंद आणि  खूप मज्जा येत आहे. पहिल्यांदाच झी मराठीसारख्या (Zee Marathi) ग्लॅमरस वाहिनीसोबत काम करण्याचा अनुभव घेत असल्याने मनात एक वेगळाच आनंद आहे.   
 ‘अग्गबाई सूनबाई’ १५ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. झी मराठीवर(Zee Marathi).