सर्वात वर

झी मराठीसोबत साजरा करूया व्हॅलेंटाईन आठवडा

Zee Marathi : रविवार होणार प्रेमवार, एका तासाचे विशेष भाग

मुंबई – झी मराठीवर (Zee Marathi) येत्या रविवारी  (७ फेब्रुवारीला) ‘होम मिनिस्टर’, ‘कारभारी लयभारी’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रेक्षक पसंतीच्या मालिकांचे १ तासाचे विशेष भाग सादर होणार आहेत.‘होम मिनिस्टर’चा हा विशेष भाग ‘माझा होशील ना’ लग्नविशेष म्हणून साजरा होणार आहे, या भागात सई आदित्यचं केळवण आणि मामांची धमाल पाहायला मिळणार आहे, सहसा लग्नात सासवा मिरवत असतात पण सईआदित्यच्या लग्नात मामा मिरवणार आहेत. आता सईला पैठणी कोण मिळवून देणार सासरचे कि माहेरचे हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

‘कारभारी लयभारी’ मालिकेत राजवीर आणि प्रियांका यांच्या मैत्री झालीय, राजवीरला प्रियांकाच्या वागण्याबोलण्यातून आपण तिला आवडत असल्याचं कळतंय. खूप प्रयत्नांनी तो प्रियांकाला प्रपोज करतो आता ह्यावर पियूचं उत्तर काय असेल, ती सुद्धा या प्रेमाला होकार देईल? की आपले वडील अंकुशराव पाटील ह्यांना घाबरून राजवीरला कायमचं विसरेल? याची उत्तरं मिळतील ‘कारभारी लयभारी’ मालिकेच्या एका तासाच्या विशेष भागात!

तर कुटुंबाच्या प्रेमाखातर राधिका करेल का आपल्या तत्त्वांचा त्याग? हे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ च्या विशेष भागातून पाहायला मिळेल.मनोरंजनाची ही धमाल येत्या रविवारी ७ फेब्रुवारीला होम मिनिस्टर दुपारी १२ आणि संध्या.७ वा., कारभारी लयभारी दुपारी १ आणि रात्री ८ वा., आणि माझ्या नवऱ्याची बायको दुपारी २ आणि रात्री ९ वा.झी मराठीवर (Zee Marathi) रसिकांना बघता यायेणार आहे.