सर्वात वर

मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक

ओम स्वीटूच्या मैत्रीत येणार प्रेमाचं नवं वळण

मुंबई – झी मराठी(Zee Marathi) वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला रसिकांनी अल्पावधीतच भरगोस प्रतीसाद दिला आहे.’येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका एका गोड नात्याची कथा सांगणारी असल्याने रसिक या मालिकेची रोज आतुरतेने वाट बघत असतात.‘शाल्व किंजवडेकर’ आणि ‘अन्विता फलटणकर’ या नव्या आणि फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.ही मालिका आता रसिकांना आता ऐका वेगळ्या वळणावर घेऊन आली आहे.ओम आणि स्वीटूच्या मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे.स्वीटूच्या मागे सावली सारखा उभा राहणारा आणि स्वीटूला प्रत्येक पावलावर मदत करणारा ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटू ला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत,काय असेल स्वीटू चं उत्तर ?

आता ह्या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी या नात्यात अडथळा ठरेल? काय असेल मालविक, मोहित आणि मोमो ची प्रतिक्रिया? शकू(आई) आणि रॉकी च्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबा कडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल?  मालिकेच्या पुढच्या भागामध्ये कळणार आहे.(Zee Marathi)