सर्वात वर

Zee Marathi : अग्गबाई सासूबाई मालिकेत आसावरीचा हटके लुक

बातमीच्या वर

संक्रांती निमित्त शुभ्रा चा लेडीज डे आऊट, संक्रांतीचा गोडवा सोहम आणि अभिजित राजे आले एकत्र. 

मुंबई – झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका अग्गबाई सासूबाई या मालिकेत प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली. एकंदरीत  ‘सासूबाई’ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.

झी मराठी (Zee Marathi) वरील ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेच्या येणाऱ्या  भागात आसावरी आणि अभिजित यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे, त्यासाठी खास चित्रीकरण करण्यात आलं संक्रांतीचा  हलव्याचे दागिने घालून नटलेली आसावरी ह्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

असावारीची सून शुभ्रा लेडीज डे आऊट साठी सगळ्या बायकांनी मिळून मज्जा करण्याचा प्लॅन ठरवते आणि सगळ्याजणी पार्लरमध्ये जातात, वेगळ्या रुपात आलेल्या आसावरीला पाहून अभिजीत अवाक होतो! तो सरप्राईज म्हणून तिच्यासाठी बाईक घेऊन येतो.

संक्रांत म्हंटली कि पतंग आलीच त्यामुळे चाळीत पतंग उडवण्याची स्पर्धा लागते. सगळे उत्साहाने स्पर्धेत सामील होतातं. वयापेक्षा मनानं तरुण असणे हेच महत्त्वाचं आहे असे अभिजीत सिद्ध करतो. या पतंगबाजी नंतर शेवटी एक फॅमिली फोटो घेतला जातो ज्यातून सोहम हळूच बाजूला होतो. पण शुभ्रा च्या लक्षात आल्या नंतर ती त्याला थांबवते.

आसावरी तो फोटो पाहून नाराज होत नाही हे बघून सोहमला बरं वाटतं. इकडे शुभ्राने ठरवलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी, सोहम शुभ्राला आईसोबत सण साजरा करअसा सांगतो. पुढे काय होणार हे झी मराठी (Zee Marathi) वरील अग्गबाई सासूबाई मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली