सर्वात वर

Zee Marathi : नाशिकची शिरीन दत्ता पाटील ठरली “महाराष्ट्राची लावण्यवती”

Maharashtra’s Lavanyavati – उपविजेती ठरली नाशिकचीच क्षमा देशपांडे

उपविजेती क्षमा देशपांडे

मुंबई – झी मराठी (Zee Marathi)वरील महाराष्ट्राची लावण्यवती या रिॲलिटी शो च्या अंतिम स्पर्धकांत “महाराष्ट्राची लावण्यवती” किताब  नाशिकच्या शिरीन दत्ता पाटील हिने पटकावला आहे त्यामुळे शिरीन पाटील महाराष्ट्र्राची पहिली लावण्यवतीठरली आहे.तर नाशिकची क्षमा देशपांडे उपविजेता ठरली आहे. नाशिकच्या या दोन सुपुत्री हि स्पर्धा जिंकल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नाशिकची शिरीन दत्ता पाटील ठरली “महाराष्ट्राची लावण्यवती”

झी मराठीने (Zee Marathi) “महाराष्ट्राची लावण्यवती” हा स्पर्धात्मक रिॲलिटी शो सुरू केलाय. हे पहिलेच वर्ष. पाश्चात्य प्रभाव असलेल्या सौंदर्यस्पर्धेच्या पलिकडे जाऊन मराठमोळं लावण्य निवडण्यासाठी सौंदर्याव्यतिरीक्त बुद्धीमत्ता, व्यक्तिमत्व, सामान्यज्ञान, संवादकौशल्य तसेच नृत्यकौशल्य, संगीत, अभिनय आदी कलागुण यासारखे निकष लावले गेले. २२०० प्रवेश होते. छाननीतून १५०० व नंतर आणखी चाळणी लावत महाराष्ट्रभरातून ५५ स्पर्धक मुली निवडल्या. त्यांची डिसेंबर २०२० मध्ये पहिली फेरी होऊन १२ मुली महाअंतिमफेरीकरिता निवडल्या गेल्या. झी मराठीकडून महिनादीड महिन्याच्या कालावधीत या मुलींकडून उत्तमोत्तम कामगिरी करून घेत दिग्गजांकडून प्रशिक्षणही देण्यात आले..त्या १२ अंतिम स्पर्धकांत “महाराष्ट्राची लावण्यवती” किताब नाशिकच्या शिरीन दत्ता पाटील आणि क्षमा देशपांडेला मिळाल्याचा आनंद प्रत्येकाला झाला आहे.