सर्वात वर

झी मराठीवर ३१ डिसेंबर पासून नवी मालिका : १३ वर्षेनंतर या अभिनेत्रीचा कमबॅक

मुंबई- झी मराठी वाहिनीवर ३१ डिसेंबर पासून नवी मालिका (Zee Marathi New series) सुरु होत आहे.गुरुवार ते शनिवार ही नवी मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून झी मराठीवरील सौदामिनी आणि नुपूर या मालिकेत आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवी  तेरा वर्षेनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. 

झी मराठीवर(Zee Marathi) गाजलेल्या असंभव या मालिकेत मानसीने शुभ्राची भूमिका साकारलेली भूमिका रसिकांच्या विशेष पसंतीस पडली होती.आता ३१ डिसेंबर पासून मानसीची ‘काय घडलं त्या रात्री?(Zee Marathi New series) या मालिकेतुन दमदार एन्ट्री होते आहे.या मालिकेत मानसी साळवी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्ये मागील कोडं सोडवण्यासाठी तिची नियुक्ती केली जाते. ही हूशार व चलाख पोलिस ऑफीसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते, पत्रकारअसो वा राजकारण कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते. 

या नव्या मालिकेबद्दल बोलतांना मानसी म्हणाली “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत आय.पी.एस. अधिकारी रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. रेवती एक कणखर अधिकाऱ्या बरोबरच एक प्रेमळ आई पण आहे. अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा सुव्यवस्था ,आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर पोलीस खातं करत. नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी कायम एकनिष्ठ असते. तेरा वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे याबद्दल खूप छान वाटतं आहेआणि ते माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे.” 

झी मराठीवरील ‘ (Zee Marathi New series) काय घडलं त्या रात्री? या नव्या मालिकेत एक प्रामाणिक महिला आय.पी.एस.ऑफीसर या मृत्यु मागचे गूढ कसं उलगडणार हे जाणून घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांना हि मालिका ३१ डिसेंबर पासून झी मराठीवर रात्री ९:३० ते १०:३० या वेळेत बघता येणार आहे.