सर्वात वर

झी मराठीवर नवी मालिका घेतला वसा टाकू नको.

बातमीच्या वर

‘वेध भविष्याचा’ च्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले पं.अतुलशात्री भगरे गुरुजी करणार मालिकेची सुरुवात

मुंबई –‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनी येत्या ७ मार्च पासून नवीन मालिका रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मनोरंजनाचा विचार करताना ‘उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा’ या घोषवाक्यासह झी मराठी रसिक प्रेक्षकांसमोर येणार आहे.महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवीन कथा घेऊन मार्च महिन्यात “घेतला वसा टाकू नको”असे या मालिकेचे शीर्षक असणार आहे. या मालिकेची सुरुवात ‘वेध भविष्याचा’ च्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले सुप्रसिद्ध ‘पं.अतुलशात्री भगरे’ गुरुजी करणार आहेत.

झी मराठी (Zee Marathi) वरील “घेतला वसा टाकू नको” ही मालिका पौराणिक कथांवर आधारित असणार आहे, आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजी कडून किंवा आई कडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी आपल्यापैकी अनेकांनी ऐकल्या असतील, ह्याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मालिका रूपात पाहिला मिळणार आहेत. या निमित्ताने झी मराठीवर एक अभिनव प्रयोग होत आहे.

ही मालिका संपूर्ण कुटुंबासाठी एक अनोखी पर्वणी असणार आहे, आपण ऐकलेल्या पौराणिक कथा आपल्या मुलांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी तेही मालिका रूपात. “घेतला वसा टाकू नको” ७ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वा. झी मराठीवर रसिक प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली