सर्वात वर

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर भाऊची कमाल,जादूची धमाल

येऊ कशी तशी मी नांदायला ची टीम चला हवा येउ द्या च्या सेटवर  

मुंबई- झी मराठी (Zee Marathi)वरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या च्या मंचावर या आठवड्यात ‘येऊ कशी तशी मी नांदायला’या मालिकेचे कलाकार हजेरी लावणार आहेत. यावेळी कलाकारांनी मालिकेतील अनुभव शेअर केले.गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजनकरत आहे.

या भागात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे खानविलकरांच्या घरातील मुख्य सदस्य ‘जादू’. भाऊ कदम बरोबर जादूने एकच धमाल उडवून दिली. हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी यावेळी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला.‘निलेश साबळेने साकारलेला ओम’ आणि ‘भाऊ ने साकारलेली स्वीटू’ यावेळी भाव खाऊन गेली. तेव्हा पाहायला विसरू नका हास्याने लोटपोट करणारे हवा येऊ द्या चे हे मजेशीर भाग रसिकांना १ ते ३ मार्च रात्री ९.३० ते १०.३० झी मराठीवर बघता येणार आहे.