सर्वात वर

शशांक केतकरचे झी मराठीवर पुनरागमन

मुंबई –सहा सासूबाईंचा आहेर ! असं म्हणत झी मराठीवर (Zee Marathi) २०१३ मध्ये गाजलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पुनरागमन होतंय,झी मराठीवर नव्याने सुरु होणारी मालिका  “पाहिले न मी तुला” या मालिकेतून तो पुनरागमन करतोय.आता ह्या मालिकेत तो कुठल्या भूमिकेत असणार हे रसिकांना सरप्राईझ असणार आहे,

शशांक केतकर  सोबत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या मालिकेत ती दोघांसोबत दिसेल. त्यामुळे रसिकांची उत्सुकता जरा ताणून धरली जाणार आहे.