सर्वात वर

शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर

मुंबई- झी मराठी (Zee Marathi) वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या मालिकेचे शुटींग महाराष्ट्राबाहेर सिल्वासा येथे सुरु आहे.मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अनेक कलावंतांसह तंत्रज्ज्ञ एकत्र येतात. ऑन स्क्रीन एकत्र कुटुंबातील सदस्यांची भूमिका साकारताना ऑफ स्क्रीनही कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये अनोखे बंध जुळतात.असंच काहीसं बाँडिंग मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळत आहे. ओमच्या आईसाठी ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर एक पत्र आलं. हे पत्र इतकं गोड होतं, की फक्त अभिनेत्री शुभांगी गोखलेच (Shubhangi Gokhale) नाही, तर त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सध्या सिल्वासा येथे सुरु आहे. मालिकेची सर्व टीम बायो बबलचं पालन करत असल्यामुळे कोणालाच आपल्या मुलांसोबत किंवा आईसोबत प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाही. अशातच सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आले आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळले.

सखी गोखलेकडून प्रेमळ भेट

अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांची कन्या आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्रही पाठवले. . “अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ झी मराठीवरील (Zee Marathi) मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद” असे सखीने पत्रात लिहिले आहे.हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं.