सर्वात वर

ही सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे !

मुंबई – झी मराठी (Zee Marathi) वरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत अपमानित आणि सैरभैर झालेला समर अनिकेत आणि मनूचा संसार सुखी होऊ देईल ? असे अनेक रसिकांना पडले आहेत. झी मराठीवरील (Zee Marathi) या लोकप्रिय मालिकेत या प्रश्नांची उत्तरे रसिकांना या आठवड्यात मिळणार आहे.अनिकेत आणि मनूने प्रेमाखातर घरच्यांपासून लपवून लग्न केलं आणि जेव्हा दोघांनी लग्न केल्याचे घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर वळण घेतलंय. 

नुकताच एकमेकांच्या साथीने संसाराचा श्री गणेशा त्यांनी केला आहे. घरच्यांनी जरी मनापासून त्यांच्या लग्नाला स्वीकारलं नसलं तरी अनिकेत मनूने आशा सोडली नाहीये. त्यांना विश्वास आहे हे चित्र लवकरच बदलणार आहे. या जगात आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत अशी अनेक जोडपी आहेत त्यांनी आपल्या खऱ्या प्रेमासाठी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न केलं आणि आपला वेगळा संसार मांडला आणि तो संसार यशस्वीपणे चालवत आहेत.असाच वेळा संसार मांडून अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांचं असं लहानसे का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. मनूच्या मनातल्या इच्छा तिने सांगण्या आधीच अनिकेत पूर्णत्वास येतील असा प्रयत्न करणार आहे. 

अनिकेतच्या ह्या सगळ्या धडपडीचं मनूला फारच कौतुक आहे.. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे.पण अपमानित आणि सैरभैर झालेला आणि मानसीसाठी ईर्षेला पेटलेला समर,अनिकेत आणि मनूचा संसार सुखी होऊ देईल ? हे “पाहिले न मी तुला” या मालिकेत रसिकांना सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. झी मराठीवर (Zee Marathi) बघता येणार आहे.