सर्वात वर

सुरक्षित प्रवासासाठी झूमकारचा पुढाकार

लसीकरण केंद्र, हॉस्पिटलला जाण्याकरिता पूर्णपणे सॅनिटाइज सेल्फ-ड्राइव्ह कारची सुविधा 

मुंबई: संपूर्ण भारत कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना भारतातील सर्वात मोठ्या सेल्फ-ड्राइव्ह मोबिलिटी प्लॅटफॉर्म झूमकारने (Zoomcar) लोकांना लसीकरण केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत करण्याचा पुढाकार घेताला आहे. लसीप्रमाणेच सुरक्षित प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त सुरक्षिततेसाठी झूमकार १००% सॅनिटाइझ केलेल्या सेल्फ-ड्राइव्ह कार उपलब्ध केल्या आहेत.

स्वच्छतेची सर्वाधिक पातळी गाठताना, झूमकारने (Zoomcar) आणखी एक पाऊल पुढे टाकले असून ग्राहकांच्या घरापर्यंत योग्य रितीने सॅनिटाइज केलेली कार पोहोचते. सखोल स्वच्छतेच्या पहिल्या फेरीनंतर, हॉटस्पॉट सॅनिटायझेशन असेल, यात वारंवार स्पर्श करणाऱ्या ३२ पॉइंट्सचे सॅनिटायझेशन होईल. उदा. किल्ली, स्टीअरिंग व्हील, गिअर, डोअर हँडल्स, पॉकेट डोअर हँड रेस्ट इत्यादी. विशेष सोल्युशनद्वारे ही स्वच्छता करून सुरक्षित कारच ग्राहकांपर्यंत सोडल्या जातात. ALVACCINE कोड वापरून हेल्थ वाउचर घ्या आणि आपली कार घरी बोलवा.

हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी किंवा इतर काही आवश्यक गरजांकरिता सुरक्षित वाहनाचा पर्याय म्हणून झूमकारसोबत जास्तीत जास्त सुरक्षा आणि आरामाची खात्री मिळते. तुम्ही झूमकारचे सबस्क्रिप्शन सर्वात कमी म्हणजेच १९,९९९ रुपयांत खरेदी करू शकता. तुमच्या वैयक्तिक वापरासाठी पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतूक कार मिळेल. जास्तीत जास्त सुरक्षेसह ३ दिवसात घरी कारची डिलिव्हरी, हवे तिथे जाण्यासाठी, अमर्याद किलोमीटरसाठी, अखंड अनुभवासाठी पे ऑन डिलिव्हरीची सुविधा झूमकारद्वारे दिली जाते. ग्राहक जास्तीत जास्त १ महिना कार स्वतःकडे ठेवू शकतात. त्यामुळे तुम्ही बाहेर जात असाल, तर तुमची कार काही मिनिटात दारासमोर उभी राहील. पर्याय म्हणून तुम्ही झूमकारला ३, ५ आणि १० दिवसांचे भाडेही देऊ शकता.

“सुरक्षित वैयक्तिक प्रवासाला सध्या अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी वैयक्तिक मोबिलिटी सोल्युशन ग्राहकांना पुरवण्याकरिता आम्ही सक्षम आहोत. प्रत्येक वापरानंतर प्रवासांच्या सुरक्षेची हमी घेत आमची वाहने सॅनिटाइज केली जातात. सरकारी नियमांचे आम्ही काटेकोर पालन करतो आणि देशभरातील ग्राहकांना सॅनिटाइझ केलेल्या कार पुरवतो,” असे झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मॉर्गन म्हणाले.

सध्याच्या गंभीर काळ लक्षात घेता झूमकार (Zoomcar) विविध संस्थांशी भागीदारी करत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय प्रदान करत आहे. भागीदारीत असलेल्या संस्थांचे अत्यावश्यक लोक कामावर पोहोचण्यातील अडथळे दूर केले जातात. जेणेकरून ते लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवू शकतील. सोशल डिस्टन्सिंगची वाढती गरज लक्षात घेता, झूमकारने (Zoomcar) उपलब्ध केलेले सेल्फ-ड्राइव्ह मोबिलिटी सोल्युशन्स विविध ग्राहकांकडून सातत्याने पसंत केले जात आहेत. यासह, प्रमुख बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता तसेच किराणा स्टोअर साखळीतील तसेच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसाठीही झूमकार प्रवासाची सुविधा पुरवत आहे.